मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संकल्पसिद्धी या पुस्तिकेचे प्रकाशन

WhatsApp Image 2019 10 13 at 10.07.42 PM

जळगाव, प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आ. राजूमामा भोळे यांनी केलेल्या विकासकामाच्या संकल्पसिद्धी या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

आ. राजूमामा भोळे यांनी गेल्या पाच वर्षभरामध्ये जळगाव शहर विधानसभेसाठी आमदार निधीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांच्या संकल्पसिद्धी या पुस्तिकेचे प्रकाशन आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महाजनादेश सभेच्यास्थळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिका प्रकाशनप्रसंगी जलसंपदा तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री ना. गिरीश महाजन, ना. गुरुमुख जगवानी, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. स्मिता वाघ, आ. शिरीष चौधरी, आ. चंदुभाई पटेल, आ. किशोर पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदुभैया महाजन, महापौर सीमा भोळे, उप महापौर डॉ. अश्विन सोनवणे तसेच मंडल अध्यक्ष राजू मराठे, कपिल पाटील, प्रदीप रोटे, धीरज सोनवणे, सुशील हसवानी, प्रा. जीवन अत्तरदे, विनोद मराठे, राहुल वाघ व अजय जोशी हे उपस्थित होते.

Protected Content