दिल्लीत चालक रहित मेट्रोचे लोकार्पण

 

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चालक विरहित मेट्रो सेवेचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकार्पण केले आहे.

मजेंटा लाईनच्या जनकपुरी पश्‍चिम ते नोएडाच्या बॉटनिकल गार्डन स्थानकांदरम्यान चालकविरहित मेट्रो गाड्या धावणार आहेत. तीन वर्षांपूर्वी मजेंटा लाईनवर मेट्रो सेवा सुरू झाली. त्यानंतर आता याच मार्गावर चालकविरहित मेट्रो सेवा सुरू होत आहे. भविष्यातील गरजांचा विचार करून देश पुढे जात आहे, असं पंतप्रधानांनी सेवेचा शुभारंभ केल्यानंतर म्हटलं. मेट्रोच्या चालकविरहित सेवेचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, वाजपेयी यांच्या प्रयत्नांमुळेच दिल्लीला पहिली मेट्रो मिळाली. आम्ही सत्तेत आलो तेव्हा ५ शहरांमध्ये मेट्रो सेवा होती. आता १८ शहरांमध्ये मेट्रो धावते आहे. २०२५ पर्यंत २५ पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू झालेली असेल. देशात होत असलेल्या अशा बदलांमुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल होतो.

Protected Content