‘गोल्डन गर्ल’ हिमावर कौतुकांचा वर्षाव

hima das 1

नवी दिल्ली प्रतिनिधी । मेटूजी ग्रँड प्रिक्स ॲथलेटिक्स स्पर्धेत 5 सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताची ‘गोल्डन गर्ल’ हिमा दासवर प्रचंड कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देखील तिचे ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे.

भारताची अव्वल धावपटू हिमानं केलेल्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल संपूर्ण देशाला तिचा सार्थ अभिमान आहे. देशाला 5 सुवर्णपदकं मिळवून देणाऱ्या हिमाच्या कामगिरीनं प्रत्येक जण आनंदीत आहे. तिचे खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यांच्या ट्विटला हिमानं उत्तर दिलं आहे. ‘सर, शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. मी कठोर परिश्रम घेऊन आपल्या देशाला आणखी पदकं जिंकून देईल,’ असा निर्धार हिमानं व्यक्त केला आहे. त्याचबरोबर, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं रविवारी स्वतः फोन करून हिमाचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. त्यावर ‘आज माझं स्वप्न पूर्ण झालं. माझे प्रेरणास्थान आणि क्रिकेटच्या देवानं मला फोन करून शुभेच्छा दिल्या. थँक यू सर…तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद,’ असं हिमा म्हणाली. याशिवाय हिमानं सचिनच्या ट्विटला उत्तरही दिलंय. मी मायदेशात परतल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन तुमचे आशीर्वाद घेईल, असं तिनं ट्विटमध्ये म्हटलं. तिने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही आभार मानले आहे. ‘शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद सर…मी खूप मेहनत घेईन. आपल्या देशाला आणखी पदकं जिंकून देईन,’ असा निर्धार तिने व्यक्त केला आहे.

Protected Content