Home Cities जामनेर पत्रकार शंकर भामेरेंची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती शहराध्यक्षपदी निवड

पत्रकार शंकर भामेरेंची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती शहराध्यक्षपदी निवड

0
105


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जामनेर तालुका मुख्य संघटक तथा निर्भिड पत्रकार शंकर रंगनाथ भामेरे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पहूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

३ जुलै २०२४ रोजी जालना जिल्हयातील भोकरकन तालुक्यामधील पिंपळगाव रेणुकाई येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या विभागीय महामेळाव्यात समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण पाटील खंडापूरकर बाबा , प्रदेशाध्यक्ष पंडितराव तिडके यांच्या शुभहस्ते संपादक गोकुळ सिंग राजपूत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा स्नेहवस्त्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे .


Protected Content

Play sound