धरणगावात उबाठाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या प्रलंबित व विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणाचे नेतृत्व पक्षाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगरसेवक भागवत चौधरी, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासह त्यांच्या इतर विविध मागण्यांसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरूवारी ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यात प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शेतकऱ्यांवरील २ लाखांवरील कर्जमाफी त्वरित द्यावी, कापसावर सरसकटभाव फरक द्यावा, खरीप व रब्बी पिकविमा अनुदान मिळावे, प्रलंबित दुष्काळ-अतिवृष्टी अनुदान मिळावे, ५०,००० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, प्रत्येक गावात शिवरस्ते तयार करणे, रासायनिक खतांची टंचाई दूर करणे, पीएम किसान योजना अडचणी दूर करणे, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफ करणे, घरगुती ३० टक्के वीज दरवाढ रद्द करणे, लाडकी बहिण योजना जाचक अटी रद्द करणे यासह इतर मागण्यांसाठी लाक्षणिक उपेाषण करण्यात आले.

Protected Content