वंश व धर्माच्या आधारावर देशात फूट पाडणारे स्वत:ला राष्ट्रवादी म्हणताय ; राहुल गांधींची मोदी आणि ट्रम्प यांच्यावर टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेमध्ये आफ्रिकी-अमेरिकी, मेक्सिकन व इतर लोकांमध्ये फूट पाडली जाते. तशीच भारतात हिंदू, मुस्लिम व शिखांमध्ये फूट पाडली जाते. असे करताना देशाचा पाया खिळखिळा होतो; परंतु असे करणारेच स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केली आहे.

 

 

अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांच्यासोबत राहुल गांधी यांनी नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी निकोलस बर्न्स अमेरिकेतील ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाबाबत ते म्हणाले की, आम्ही सहिष्णू आहोत म्हणून एकसारखे वाटतो. आमचा डीएनए सहनशील मानला जातो. आम्ही नव्या विचारांना स्वीकारतो. आम्ही खुल्या विचारांचे आहोत; परंतु आता ते गायब होत आहे. मात्र, मी आशावादी आहे. कारण देशाच्या डीएनएला मी जाणतो. कोरोनाच्या संकटाने आम्हाला बरेच काही शिकवले आहे. तर राहुल गांधी यांनी यावेळी दोन्ही देशांतील सत्तारूढ पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, जेव्हा अमेरिकेमध्ये आफ्रिकी-अमेरिकी, मेक्सिकन व इतर लोकांमध्ये फूट पाडली जाते. तशीच भारतात हिंदू, मुस्लिम व शिखांमध्ये फूट पाडली जाते. असे करताना देशाचा पाया खिळखिळा होतो; परंतु असे करणारेच स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेत आहेत.

Protected Content