Home क्राईम चारित्र्याच्या संशयातून सासरच्या लोकांनी केले विवाहितेचे मुंडण

चारित्र्याच्या संशयातून सासरच्या लोकांनी केले विवाहितेचे मुंडण

0
34



कोल्हापूर (वृत्तसंस्था)
चारित्र्याच्या संशयातून सासरच्या लोकांनी विवाहितेचे मुंडण केल्याची धक्कादायक घटना शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे घडली आहे. याप्रकरणी पती, सासू, दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

तेरवाड येथील गंगापूर भागात एकत्र कुटुंबात राहणार्‍या पीडित महिलेला सासरच्या लोकांनी तुझे कोणाबरोबर तरी अनैतिक संबध आहेत असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सासू शांताबाई बागडी, दीर गणपती बागडी तसेच पती मनोज श्रीकांत बागडी यांनी मिळून वस्ताऱ्याने डोक्यावरील केस कापून मुंडण केले. याप्रकरणी पती सासू व दीर या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.


Protected Content

Play sound