राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांच्यावर

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांच्यावर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल २४ हजार ८८६ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १० लाख १५ हजार ६८१ इतकी झाली आहे.

राज्यात आज दिवसभरात ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर १४,८०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, राज्यात सध्या २ लाख ७१ हजार ५६६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना मृत्यू दर हा २.८३ वर गेला आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल २४ हजार ८८६ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १० लाख १५ हजार ६८१ इतकी झाली आहे.

आज १४ हजार ३०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७ लाख १५ हजार ०२३ जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.८३ टक्के एवढा झाला आहे. देशातही रुग्णांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. एकाच दिवसात तब्बल ९६ हजार ५५१ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर आज १२०९ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता ४५ लाख ६२ हजार ४१४ झाली आहे.

Protected Content