विखेंच्या जागी त्यांचे कट्टर विरोधक थोरात यांची वर्णी

vikhe thorat

मुंबई (वृत्तसंस्था) माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसने विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

 

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. आमदार नसीम खान यांच्याकडे विधानसभा उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बसवराज पाटील यांची मुख्य प्रतोदपदी तर के.सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे यांची तर उपनेतेपदी रामहरी रुपनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या प्रतोदपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपची वाट धरली होती आणि आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला होता. आता विधानसभा निवडणुकाही जवळ आल्याने काँग्रेसने पक्षांतर्गत फेरबदल करत बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Protected Content