जामनेर नगरपालिकेतर्फे शहरात राबवले स्वच्छता अभियान

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नगरपरिषद जामनेरतर्फे स्वच्छ सर्वेक्षण मोहीम अंतर्गत जामनेर शहरातील जळगाव रोड भागात साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

जामनेर नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2023 वसुंधरा अभियान त्याचबरोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जात असून त्या माध्यमातून दिनांक 28 रोजी जळगाव रोड भागामध्ये नगरसेवक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साफसफाई मोहीम राबवण्यात आली त्याचबरोबर गुरुवार रोजी शहरात प्लास्टिक बंदी मोहीम राबवली जाणार असून जर कोणाकडे प्लास्टिक आढळली तर त्यांच्यावर दंड करण्यात येणार आहे.

त्याच बरोबर नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार असून शहरवासीयांनी प्लास्टिक थैली न वापरता कापडी पिशवी वापरावी असे आव्हान करण्यात येणार आहे. शुक्रवार रोजी नगरपालिकेच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून ही स्पर्धा सकाळी सात वाजता बोदवड चौफुली महाराणा प्रताप चौक पासून सुरू होणार असून स्पर्धेच्या समारोप जळगाव रोड वरील सोनबर्डी जवळ होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा मध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये शहर स्वच्छ बनवण्यासाठी व शहरवासी यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी सर्वांनी स्वच्छता अभियान व मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आव्हान जामनेर नगरपालिकेच्या वतीने लोक नियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर गटनेते येथे डॉक्टर प्रशांत भोडे मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांनी केले आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, आरोग्य सभापती बाबुराव हिवराळे, नगरसेवक रिझवान शेख, शरीफ पिंजारी, भगवान सोनवणे, रविंद्र शिवदे, दत्तात्रय सोनवणे, उपमुख्यअधिकारी दुर्गेश सोनवणे आधी उपस्थित होते.

Protected Content