किनगाव येथील गरबा दांडिया उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथे गेल्या नऊ दिवसांपासून सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू होता महिलांनी या उत्सवा दरम्यान सालाबादाप्रमाणे माता राणीची मनोभावे पुजा करण्यासह उपवासही केले तर नवरात्री उत्सवा निमीत्ताने किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूल व ज्युनियर काँलेजच्या प्रांगणात शैलेजाताई पाटील यांच्या संकल्पनेतून स्कुलच्या व्यवस्थापक पुनम पाटील यांनी गरबा दांडीया स्पर्धच्या कार्येक्रमाचे आयोजन केले होते.

यात किनगाव व परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालक महीला व त्यांच्या सहकारी महीलांसह स्कुलच्या महिला शिक्षकांनीही उत्साहात सहभाग घेतला. या दांडीया कार्येक्रमासाठी प्रथम विजेता कावेरी पाटील (आडगाव) व लावंण्या पाटील(डोणगाव) यांना शैलेजाताई पाटील यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शैलेजाताई विजयकुमार पाटील व्यवस्थापक पुनम पाटील, उप-प्राचार्य राजश्री अहिरराव, योगीता बिहारी, देव्यानी सोळुंके, भावना चोपडे, प्रतिभा धनगर, वैशाली धांडे, पुजा डी.शिरोडे, नूतन देशमुख, अनिता देशमुख, रामेश्वरी कांबळे इ.शिक्षीका तसेच पालक महिला प्रतिक्षा महेश पाटील (उंटावद) नुतन पाटील (पारगाव) भावना ठोके, अश्वीनी पाटील, रूपाली पाटील, अंकीता पाटील, प्राची पाटील, चंन्दा पाटील, मानसी पाटील, आर्या पाटील, कावेरी पाटील इ.सह महिला पालकांनी दांडीया कार्येक्रमात भाग घेतला.

 

 

 

Protected Content