माथेफिरू प्रियकराने घरात घुसून केली प्रेयसीची हत्या

हुबळी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कर्नाटक राज्यातील हुबळी शहरात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शहरातील वीरपुरा भागात घडली. आरोपी प्रियकराचे गिरीश असे नाव असून अंजली अंबिगेरा असे मृत प्रेयसीचे नाव आहे. मृत तरूणीचे वय २१ वर्ष आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरूण हा 15 मे रोजी पहाटेच्या सुमारास तरूणीच्या घरात शिरला आणि त्याने चाकू भोसकून तरूणीची हत्या केली. त्यानंतर तो पळून गेला. त्यांच्या काही चोरीचे गुन्हे देखील दाखल आहे. तो पालकांना न सांगता अंजलीला म्हैसूरला जाण्याचा दबाव टाकत होता आणि अंजलीला सतत धमक्या देत असे. या मिळणाऱ्या धमक्याची तक्रार अंजलीची आजी गंगाम्मा यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे केली होती. पण त्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही

Protected Content