एलसीबीचे निरिक्षक बापू रोहम यांच्या बदलीची चर्चा

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर आता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्या बदलीचे संकेत मिळाले असून याबाबत लवकर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

जिल्हा पोलीस दलात अलीकडच्या काळात खांदेपालट करण्यात आला आहे. यात जिल्हा पोलीस अधिक्षक, अपर अधिक्षक, सहाय्यक अधिक्षकांसह डीवायएसपींच्या बदल्या झालेल्या आहेत. यानंतर आता एलसीबीमध्येही बदली होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बापू रोहम यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळाले असून याबाबत लवकरच बदलीचे निर्देश प्राप्त होऊ शकतात. तर प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना पीआय बापू रोहम यांनी याबाबत आपल्याला कोणताही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर, दुसरीकडे रोहम यांच्या जागी आधी नशिराबाद पोलीस स्थानकाची धुरा सांभाळलेले सार्थक नेहते यांची वर्णी लागणार असल्याची माहिती देखील खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Protected Content