कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय उपोषण (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोळी समाजाचे आरक्षण अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा. भाऊसाहेबर सोनवणे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत आहे.

सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून कोळी समाजावर अन्याय होत आहे. कोळी समाज बांधव यांना न्याय मिळला नाही. यासंदर्भात आज राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण आंदोलन करण्यात येत आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अनुसूचित जमातीचे दाखले कोळी समाजाला सहज उपलब्ध करून द्यावे, जात वैधता प्रमाणपत्र विनाअट मिळावी आणि जिल्हास्तरावर जात पडताळणी कार्यालय करण्यात आले. या मागणीसाठी आज समस्त कोळी समाज बांधव जळगाव शहर व जळगाव ग्रामीणच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला निवेदन देण्यात येत आहे. कोळी समाजाचे प्रश्‍न तत्काळ निकाली काढावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून याला सर्वस्वी जबाबदार महाविकासआघाडी असेल असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनात प्रा. भाऊसाहेब सोनवणे, सुकलाल सैंदाणे, संजय सोनवणे, जितेंद्र सोनवणे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1326032061063983/

Protected Content