नाना शंकरशेठ यांना भारतरत्न द्या- सुवर्णकार सेनेची मागणी

जळगाव प्रतिनिधी । मुंबई महानगरीचे शिल्पकार तथा ख्यातनाम दानशूर महापुरूष नाना शंकरशेठ यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुंबई शहराचे आद्यप्रवर्तक नाना शंकरशेठ यांनी इंग्रजांच्या काळी रेल्वे सुरु करण्याकरीता दिलेली व्ही. टी. स्टेशनची जागा ही त्यांची वडिलोपार्जित होती. ती जागा त्यांनी इंग्रज सरकारला मोफत दिली. मुंबई विद्यापीठ, एलफिस्टन कॉलेज, मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई विद्यापीठ आणी महत्वाचे म्हणजे जवळ जवळ १८५३ साली पहिली मुलींची शाळा आदी अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. मुंबईत अनेक रस्ते, दवाखाने उभारले. भारतात पहिली जहाज कंपनी देखील सुरु केली. मुंबई शहर घडवण्यात नाना शंकरशेठ यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना या योगदानाबद्दल भारतरत्नाने सन्मानित करावे. यासोबत संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करण्यात यावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी संजय विसपुते, संजय पगार, विशाल विसपुते, धनराज जाधव, श्याम भामरे, इच्छाराम दाभाडे, योगेश भामरे, बबलू बाविस्कर, दीपक जाधव, रत्नाकर दुसाने, सचिन सोनार, सुरेश सोनार, सुभाष सोनार, शरदचंद्र रणधीर, पंकज रणधीर, भगवान दुसाने, विनोद सोनार आदी समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content