शिरसाळे बुद्रुक येथील जुगार अड्डयावर छापा

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाळे बुद्रुक येथील जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, शिरसाळे बुद्रुक येथे गाव विहिरीच्या बाजूला काही लोक जुगार खेळत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील हितेश बेहेरे, प्रशांत पाटील, कैलास साळुंखे, सुहास पाटील यांच्या पथकाने संबंधीत अड्डयावर पथकाने छापा टाकून सहा जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.

या कारवाईत शिरसाळे येथील रईस शेख मज्जित (वय ३१), पंडित पीतांबर पाटील (वय ४७), पोपट अर्जुन चौधरी (वय ६६), निसार शेख नसीर (वय ५०), सिरजुद्दिन शेख (वय ३८) व पिंपळे येथील संभाजी आत्माराम पाटील (वय ५२) यांच्याकडून एकूण १ लाख २५ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हितेश बेहेरे यांच्या फिर्यादीवरून मारवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content