मुंबईच्या गुन्ह्यातील फरार महिलेला भुसावळात अटक

भुसावळ प्रतिनिधी । दागिने चोरीच्या घटनेत मुंबईतील काशी मीरा पोलिस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेस भुसावळातल्या पापा नगर या भागातून अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील काशी मीरा पोलिस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील कुब्रा मोहंमद इराणी (रा.भिवंडी, मुंबई) या महिलेस अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेच्या पतीने हातचलाखीने दागिने लांबवले. नंतर हे दागिने पत्नीकडे सोपवल्याचा संशय आहे. काशी मीरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जावेद मुल्ला यांनी बाजारपेठ पोलिसांना संबंधित महिला भुसावळातील पानर नगरात आल्याची माहिती दिली. त्यानुसार कुब्रा इराणी हिला अटक झाली. ही कारवाई विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव, प्रिया अरखराव व कमलाकर बागुल यांच्या पथकाने केली.

Protected Content