विवेक ठाकरे यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परीट समाजासाठी रावेर तालुका सचिव ते महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष असा चढता प्रवास करीत २०१९ मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या दहा दिवसाच्या उपोषणामुळे परिट समाजाच्या पूर्ववत आरक्षणाची केंद्राला राज्य सरकारने केलेली शिफारस याची दखल म्हणून अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व परीट समाजाचे धडाडीचे नेते विवेक देविदास ठाकरे यांचा नुकताच पुणे येथे रविवार, १० मार्च रोजी ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.

पुण्यातील शिवाजीनगर भागातील रोकडोबा मंगल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर हे होते. अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व परीट सेवा मंडळाचे माजी प्रदेशाध्यक्ष एकनाथराव बोरसे, नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व आरक्षण चळवळीचे अभ्यासक अनिल शिंदे, प्रा.डॉ. पंढरीनाथ रोकडे,एकता बहुउद्देशीय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर परदेशी,राष्ट्रीय सचिव राज परदेशी आदी मान्यवरांच्या हस्ते विवेक ठाकरे व मनीषा ठाकरे यांचा हा गौरव झाला. व्यक्ती मोठा नसतो तर समाज मोठा असल्याचे मान्य करून प्रत्येकाने समाजाचे आपण पांग फेडण्याच्या उद्देशाने कार्यरत राहिले पाहिजे अशा भावना व्यक्त करून समाजाने छोट्या कार्यकर्त्याची घेतलेली दखल ही खूप मोठी असून यापुढे समाजाचे काम करतांना दहा हत्तीचे बळ मिळेल अशा कृतार्थ भावना सत्कारामूर्ती विवेक ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

यावेळी दिलीप शिंदे, अँड. जगदीश कुंवर, अँड.संतोष शिंदे, श्रीरंग मोरे, ज्ञानेश्वर गवळी, खंडेराव कडलग, सुधीर लोणकर, सुभाष टाले, योगेश किल्लेदार, अशोक सपके, प्रा.रमेश सांबस्कर, अँड.आकाश फाले, सोमनाथ वाघ, के.आर.राऊत, नितीन भातूरकर, राजेंद्र हिवाळे, दत्तात्रय पवार, राजकुमार मालवीय, अनिल खडके, हरिभाऊ काळे, विजय बोऱ्हाडे, प्रा.डॉ.अरुण पेढेकर, विजय बोदडे, अजय श्रीवास्तव, प्रशांत बेडिस्कर, श्रीकृष्ण सोमाळे,अँड.धनराज जोर्वेकर, सौ.अरुणाताई जोर्वेकर, धनश्री ठाकरे, भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित होते.

Protected Content