पंतप्रधानाच्या हस्ते होणार ५९०० रेल्वे प्रकल्पाचे उद्‍घाटन

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे १२ मार्च रोजी देशभरातील अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्‍घाटन करणार आहेत. या कामामध्ये १५० वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स, १७० इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम, १३० सौर पॅनेल, १८ नवीन रेल्वे मार्ग / रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण/ गेज रूपांतरण, १२ गुड्स शेड, ७ स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली, ४ गती शक्ती कार्गो टर्मिनल, ३ विद्युतीकरण यांचा समावेश आहे. याशिवाय देशभरातील १० वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या हस्ते एकूण ५०६ प्रकल्पांचे उद्‍घाटन व काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले जाणार आहेत. यामध्ये लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपोचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि नागभीड येथे पाच जनऔषधी केंद्रांचे उद्‍घाटन नियोजित आहे. याशिवाय नाशिकरोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली येथे चार रेल कोच रेस्टॉरंटचे उद्‍घाटनाचा समावेश आहे

Protected Content