समग्र विकासासाठी तिसर्‍यांदा द्या कौल ! : रक्षाताई खडसे

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या समग्र विकासासाठी आपल्याला तिसर्‍यांना कौल द्यावा असे आवाहन रावेर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी केले. त्या चोपडा तालुक्यातील प्रचारफेर्‍यांमध्ये बोलत होत्या.

आरावेर लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, मनसे, रासप आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचार फेर्‍यांना नागरिकांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आज त्यांनी चोपडा तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचार केला. यात प्रामुख्याने चोपडा तालुक्यात धानोरा, अडावद, मंगरूळ, खेडीभोकरी, गोरगावले बु., गोरगावले खु. व खडगाव येथे प्रचार फेर्‍या काढून जनतेला कौल मागण्यात आला.

गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात समग्र विकास झाला असून स्थानिक पातळीवर देखील अनेक महत्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. मतदारसंघात आगामी काळामध्ये अनेक महत्वाच्या कामांना गती देण्यात येणार असून सशक्त भारताच्या निर्मितीसाठी जनतेने आपल्या संधी देण्याचे आवाहन खासदार रक्षाताई खडसे यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी रक्षाताई खडसे यांच्या सोबतीला भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, रिपाइं आठवले गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष व मित्रपक्षांच्या महायुतीने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Protected Content