नोटबंदी आधीच्या तुलनेत २२ टक्क्यांंनी रोख व्यवहार वाढला

2 73

 

नई दिल्ली (वृत्तसंस्था) नोटबंदी आधीच्या तुलनेत ३१ मे २०१९ पर्यंत व्यवहारात असलेली रोकड (करन्सी इन सर्क्युलेशन) २२ टक्क्यांपेक्षा अधिकने वाढत २१.७१ लाख करोडच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचली आहे. यामुळे पुन्हा एका मोदी सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’च्या इव्हेंटवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

 

या संदर्भात ‘द वायर’ ने वृत्त प्रकाशित केले आहे.  मोदी सरकारने नोटबंदी करण्यामागे व्यवहारातील रोकड कमी करणे,नकली नोटा आणि काळा पैसा नष्ट करणे, हे उद्दिष्ट असल्याचे सांगितले होते. परंतू काळा पैसा, बनावट नोटा या गोष्टींवर नोटबंदीचा काहीही उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता व्यवहारातील रोकड कमी करण्याचा मुद्द्दा देखील फोल ठरल्याचे उघड झाले आहे.

 

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २५ जून रोजी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना ही माहीती सांगितली. सीतारमण यांनी सांगितले की, ४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत १७.७४ लाख करोड रुपये हे रोख स्वरुपात चलनात होते. तर आता हे चलन २२ टक्क्यांपेक्षा अधिकने वाढत २१.७१ लाख करोड पर्यंत पोहचले आहे. याचाच अर्थ असा होतोय की, आपल्या अर्थव्यवस्थेत रोकड मोठ्या प्रमाणात परत आलीय. सीतारमन यांनी मात्र, सांगितले की, २०१६ मध्ये डिजिटल व्यवहार ११२.२७ करोड रुपये होता. जी आता सप्टेबर २०१८ मध्ये वाढत १८८.०७ लाख करोड झालाय.

 

आपल्याला माहित असावे की, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर २०१८ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार जवळपास बाद झालेल्या चलनाचा सर्व पैसा बँकेत परत आलेला आहे. रिझर्व्ह बँकेला नोटबंदीनंतर ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांचे एकूण १५.३१० लाख करोड रुपये परत मिळाले होते. हा आकडा नोटबंदीच्या वेळी चलनात असलेल्या १५.३१७ लाख करोड रुपयांच्या ९९.३ टक्के एवढा आहे.

 

अर्थमंत्र्यांनी बनावट नोटांचे चलन रोखण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या आकड्यांनुसार २०१६-१७ मध्ये एकूण ७,६२,०७२ बनावट नोटा पकडल्या गेल्या होत्या. तर २०१७-१८ मध्ये ५,२२,७८३ तसेच २०१८-१९ मध्ये ३,१७,३८९ नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.

 

सीतारमन यांचे म्हणणे आहे की, या हिशोबाने नोटबंदी मुळेच बनावट नोटांवर लगाम लागली आहे. दुसरीकडे मात्र, रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले होते की, एकूण ४०० करोड रुपयाचे बनावटी चलन व्यवहारात असून हा आकडा एकूण चलनाच्या खुप कमी आहे.

Protected Content