इलेक्ट्रिक पोल भर रस्त्यात कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

 

mukt

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । एमएसआरडिसी अंतर्गत इंदोर औरंगाबाद रस्ता कॉंक्रिटीकरणांचे काम सुरू असून, तत्पूर्वी शहरातून गटारी व रस्त्यातील इलेक्ट्रिक तारा हटवून अंडरग्राउंड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र गुरुवारी (दि. 27 जून) रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास अचानक इलेक्ट्रिक खांब भर रस्त्यात कोसळला.

या दरम्यान माहिती अशी की, खांब कोसळला त्यावेळी रस्तावर कोणीही नसल्यामुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. पंरतू, धोका नसल्याचे सांगत गेल्या चार-पाच दिवसापूर्वी पोर्टलवरून विद्युत वहन खंडित करून अंडरग्राउंड केबलद्वारे विद्युत वहन सुरू असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उपअभियंता मनोज चौधरी यांनी दिली आहे.तर भर रस्त्यात पडलेला तारा यामुळे रहदारी रखडल्याने वीज वितरण कंपनीचे रमेश सोनवणे, गणेश वंजारी, सोपान कळसकर, हर्ष सहगल, दिनेश धाडे व निलेश चौधरी आधी कर्मचारी व अक्षद इलेक्ट्रिकल अँड मर्वी इलेक्ट्रिकल या कंपनीचे 20 ते 25 कामगार यांन या पोलच्या तारा कट करुन रस्ता मोकळा करण्यात आला आहे. तर पोलीस हवालदार मोजेश पवार व कल्पेश आमोदकर यांनी वाहतूक नियंत्रित ठेवण्यास मदत केली.

Protected Content