Home क्राईम नाशिक अन्न व औषध प्रशासन गुप्तवार्ता विभागाची धडक कारवाई; रंगयुक्त सुपारीचा ११...

नाशिक अन्न व औषध प्रशासन गुप्तवार्ता विभागाची धडक कारवाई; रंगयुक्त सुपारीचा ११ ट्रक साठा जप्त्


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अन्न व औषध प्रशासनाचे गुप्तवार्ता विभागास मालेगाव मनमाड रोडवरुन कर्नाटकातुन दिल्ली येथे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतुक ट्रकमधुन होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्या अनुशंगे श्री दाभाडे यांनी हॉटेल हरयाणा मेवात ढाबा व-हाणे शिवार येथे शोध घेतला असता त्यांना रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतुक करणारे तब्बल ११ ट्रक हॉटेलल्या मागे छुप्या पध्दतीने लावलेले आढळून आले. सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये किटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली व ते लपविण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारी चा सुमारे २५२ टन साठा मिळून आला. त्यामुळे नाशिक कार्यालयाचे पथकास पाचारण करण्यात आले. सदर पथक घटनास्थळीदाखल झालेनंतर सुपारीचे एकुण ११ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येवून उर्वरीत २५२.३टन किंमत रुपये ३ कोटी ८४ लाख १९ हजार ९८३ इतक्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. सदरचे नमुने विश्लेशणासाठी पाठविण्यात आलेले असून पुढील तपास अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे श्री अविनाश दाभाडे, अन्न् सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता यांचे मार्फत करण्यात येत आहे.

सदर कार्यवाही ही श्री राहुल खाडे सह आयुक्त (दक्षता), अन्न व औषध प्रशासन म. राज्य मुंबई यांचे यांचे मार्गदर्शनाखाली व नाशिक विभागाचे सह आयुक्त श्री संजय नारागुडे यांचे नियंत्रणाखाली सहायक आयुक्त (अन्न) श्री विवेक पाटील यांचे उपस्थिती मध्ये श्री अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), श्री प्रमोद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, श्री योगेश देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी, श्री गोपाळ कासार, अन्न सुरक्षा अधिकारी, श्री अमित रासकर, अन् सुरक्षा अधिकारी, तसेच महिल अन् सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन व श्रीमती सायली पटवर्धन यांचे समवेत श्री सचिन झुरडे नमुना सहाय्यक यांच्या संपूर्ण पथकाने केली असून सदरची कारवाई सोमवारी उशिरापर्यंत सुरु होती,


Protected Content

Play sound