शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी शिवसेनेचा तहसिल कार्यालयावर मोर्चा


shiv sens logo
 

धरणगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. 25 नोव्हेंबर (सोमवार) रोजी राज्यपालांचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने दि. 25 नोव्हेंबर (सोमवार) रोजी धरणगाव तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

राज्यातील अल्पभुधारक शेतकरी अवकाळी पावसामुळे कोलमडून पडला आहे, भारतीय अर्थव्यवस्थेवर असलेल मंदीचे सावट, गेली दहाबारा वर्ष दुष्काळ,अतिवृष्टी,ओला दुष्काळ या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 25 रोजी सकाळी 11 वाजता धरणगाव नगरपालिका येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर मोर्चा तहसिल कार्यालयांवर पोहचेल. आपल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळून देण्यासाठी मोर्चामध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, जि प सदस्य, प स सदस्य नगरसेवक, महिला आघाडी, युवा सेना व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, धरणगाव शिवसेना तालुका प्रमुख गजानन पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी केले आहे.