पिंप्री खुर्द, प्रतिनिधी | येथे आज दि. २२ नोव्हेबर रोजी उपसरंपच निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. यात इंदूबाई देविदास चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
पिंप्री खुर्द ग्रामपंचायतीच्या तत्कालीन उपसरपंच सेवाबाई शिवाजी बडगुजर यांनी ठरल्याप्रमाणे उपसरंपच पदाच्या राजिनामा दिला होता. यानंतर आज रिक्त उपसरपंच पदासाठी निवड घेण्यात आली. मात्र, इंदूबाई देविदास चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी सुनिल बोरसे यांनी काम पाहिले.नवनिर्वाचित उपसरंपच इंदूबाई चौधरी यांचे ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच योगिता विजय सुर्यवंशी माजी उपसरपंच सेवाबाई शिवाजी बडगुजर , माजी सरपंच सरला बाई ज्ञानेश्वर बडगुजर , ग्रामपंचायत सदस्य अरूण पवार, राजू बिजविरे, राकेश चौधरी, अनुसया सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सुनिल बोरसे यांच्यासह नाना भाऊ बडगुजर, देविदास बडगुजर, देविदास चौधरी, शांताराम मोहकर, विजय सुर्यवंशी, शंकर पवार, बाळू चौधरी, दिपक चौधरी, पत्रकार संतोष पांडे, मुकेश चौधरी , गोविंदा बडगुजर, कर्मचारी भरत बडगुजर, सुभाष सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देत उपसरपंच यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्यात.