म्युकरमायकोसिसचा आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेत समावेश करा — प्रियंका गांधी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना म्युकरमायकोसिसच्या उपचाराचा आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेत समावेश करावा,  इंजेक्शनचा रूग्णांना मोफत पुरवठा केला जावा. अशी मागणी केली आहे.

 

प्रियंका गांधींनी या संदर्भात केलेल्या ट्विटसोबत पंतप्रधान मोदींच्या नावे एक पत्र देखील जोडलेले आहे.

 

“म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस)च्या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर मागणी  आहे. जगभरात औषध पुरवठा करूनही आपल्याला या संकटात वेळोवेळी औषध तुटवडा भासत आहे. जबाबदार कोण आहे? इंजेक्शन महागडे आहे, आयुष्मान योजनेत कवर होत नाही. पंतप्रधान मोदी, कृपया या दिशेने तातडीने पावलं उचलावी.” असं प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

 

देशात म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे, मात्र या आजारात मिळणारे इंजेक्शन सहज उपलब्ध होत नाही. मोठ्यां संख्येने लोकं या औषधासाठी मागणी करत आहेत. अशातच इंदुरमधील एका मुलीचा तिच्या वडिलांसाठी इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी करणारा व्हिडिओ पाहून सर्वांना अतिशय दुःख झालं. दिल्लीत लष्कराच्या दोन रूग्णालयांमध्ये दाखल असलेल्या सैनिकांवर उपचार करताना म्युकरमायकोसिसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या या इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली.”

 

काळाची गरज आहे की या संबंधी आपण त्वरीत निर्णय घ्यावा, जेणेकरून लोकांचा जीव वाचवता येईल. या आजाराबाबत तुमच्या सरकारचे धोरण यांच्या गंभीरतेला अनुरूप राहिलेले नाही. रूग्ण संख्येच्या तुलनेत राज्यांना उपलब्ध करून दिलेल्या इंजेक्शनची संख्यात अतिशय कमी आहे. देशात २२ मे पर्यंत या म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या ८८४८ सांगण्यात आली होती. यानंतर २५ मे रोजी रूग्ण संख्या वाढून ११ हजार ७१७ झाली. केवळ तीन दिवसांत २ हजार ८६९ रूग्ण वाढले. म्युकरमायकोसिस सारखा आजार ज्यामध्ये ५० टक्के मृत्यू दर असतो. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. म्युकरमायकोसिसच्या उपचारावरच लाखो रुपयांचा खर्च येत आहे. यावरील इंजेक्शन अद्याप आयुष्मान योजने अंतर्गत देखील कवर होत नाही. माझा तुम्हाला आग्रह आहे की, या आजारावरील उपचाराला आयुष्मान योजनेच्या कक्षात आणले जावे किंवा याचा इंजेक्शन पुरवठा रूग्णांना मोफत केला जावा.” अशी देखील प्रियंका गांधी यांनी मागणी केली आहे.

 

Protected Content