किरकोळ कारणावरून तरूणाला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल गेटजवळून पायी जात असलेल्या तरूणाला किरकोळ कारणावरून एकाने शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, फैजान राजू पटेल रा. राजमालती नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फैजान पटेल हा बहिणीसोबत गेंदालाल मिल गेट जवळून पायी जात होता. त्यावेळी राज अजय सुरवाडे रा. राजमालती नगर याने किरकोळ कारणावरून फैजान पटेल याला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर फैजान याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ४ वाजता शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील हे करीत आहे.

Protected Content