दीड लाखांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केळीचा व्यवसाय करण्यासाठी माहेराहून दीड लाख रूपये आणावे अशी मागणी करत तांबापूर येथील माहेरवाशीला मध्यप्रदेशातील आलमगंज येथे सासरी मारहाण करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापूरा येथील माहेर असलेल्या तबस्सुम मोईन पटेल वय २५ यांचा विवाह मध्यप्रदेशातील आलमगंज येथील मोईन माजीत पटेल यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर काहीही महिन्यानंतर पती मोईन पटेल याने केळीचा व्यवसाय करण्यासाठी माहेराहून दीड लाख रूपये आणावे अशी मागणी करत विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिला तोंडी तीन वेळा तलाक तलाक तलाक असे बोलून बेकायदेशीरित्या तलाक दिला आहे. तसेच सासू सासरे, जेठाणी यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला आहे. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी तांबापूरा येथे निघून आल्या. त्यानंतर शुक्रवारी २६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती माईन माजी पटेल, सासू शहाजाद बी माजीद पटेल, सासरे माजीद पटेल आणि जेठाणी आरफीन मोहसीन पटेल सर्व रा. आलमगंज मध्यप्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

Protected Content