चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालक्यातील मांदूर्णे गावाजवळील रस्त्यावर अचानक मालवाहू वाहनाचे टायर फुटल्याने वाहन पलटी झाल्याने चालकाचा दबुन मृत्यू झाला तर एकजण गंखमी झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश सुकदेव चव्हाण वय ६५ रा. शिवाजी नगर, मालेगाव जि.नाशिक असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, रमेश चव्हाण हा चालक त्याच्या ताब्यात असलेले मालवाहू वाहन क्रमांक (एमएच ४८ एवाय ७३५८) ने १५ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता चाळीसगावहून मालेगाव येथे जात असतांना चाळीसगाव तालुक्यातील मांदूर्णे गावाजवळील रस्त्यावर त्यांच्या वाहनाचे अचानक टायर फुटले. त्यामुळे चालक रमेश चव्हाण यांचे वाहनावरील ताबा सुटल्याने वाहनाने हेलकावे घेतल्याने वाहन पटली झाले. यात चालक रमेश चव्हाण हे वाहनाखाली दाबले गेल्याने जागीच ठार झाले तर सोबत असलेले शशीकांत रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अखेर चौकशी अंती शुक्रवारी २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता शशीकांत चव्हाण यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मिलींद शिंदे हे करीत आहे.