यावल शहरात गटारी नाले तुंबल्याने नागरिकांना त्रास; स्वच्छता करण्याची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विस्तारित वसाहतीमधील विविध भागात गटारी व नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढला असल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

यावल शहरातील विस्तारीत झालेल्या फालकनगर, आयशानगर, चांदनगर,पांडूरंग, सराफनगर व अन्य कार्यक्षेत्रात विविध ठिकाणीच्या गटारी या दुर्गंधीयुक्त घाणीच्या पाण्याने व कचऱ्याने तुंब भरलेल्या आहे. या गटारींची सफाई न झाल्याने त्या ठीकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून नागरीकांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दरम्यान आयशानगरच्या मस्जिदच्या बाजुने असलेल्या मोठया नाल्यात गेल्या अनेक दिवसांपासुन दुर्गंधीचा कचरा साचल्याने घाणीचे पाणी वाहण्यास अडचण निर्माण होऊन नमाज पठणासाठी येणाऱ्या नागरीकांना व परिसरातील राहणाऱ्या नागरीकांना या दुर्गंधी सामना करावा लागत असुन , दरम्यान पावसाळा एका महीन्यावर येवुन ठेपला असुन, पावसाळ्या आदी जर हा नाला व गटारीची सफाई न झाल्यास नागरीकांना अनेक आरोग्या विषयी समस्यांना सामोरे जावे लागेल , तरी नगर परिसदच्या आरोग्य प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेवुन पावसाळ्या आदी तरी नाला व गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी होत आहे .

Protected Content