रिपाई आठवले गटातर्फे राजगृहावरील हल्ल्याचा निषेध

यावल, प्रतिनिधी । दादर मुंबई येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या यावल तालुका आठवले गटाच्या शाखाच्या वतीने तिव्र जाहीर निषेध व्यक्त करून या सर्व घटनेची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना देण्यात आले.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्टू राज्यातील महा विकास आघाडी शासनाच्या काळात बौध्दांवर हल्ले वाढत असून तसेच मुंबई येथील महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या घरावर काही समाजकंटकानी हल्ला करून नासघुस केली आहे. दरम्यान ११ जुलै १९९७ रोजी घाटकोपर पुर्व येथे माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर बेछुट गोळीबार करण्यात आले असता त्या११ जण शहीद झाले होते . त्या शहीद झालेल्यांचा स्मृतीदीन म्हणुन ११ जुलै रोजी आंबेडकरी जनता पाळते सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे यावल तालुका अध्यक्ष अरूण सुपडू गजरे , तालुका उपाध्यक्ष भिमराव गजरे, राजु सुरवाडे , पंकज हिवरे व सागर गजरे उपस्थितीत होते .

Protected Content