यावल येथे पंडीत दिनदयाळ जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिम

यावल प्रतिनिधी । येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताने शहरात विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आले.

दरम्यान आज २५ सप्टेंबर रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जंयतीनिमित्ता त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभीवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदचे सभापती रविन्द्र पाटील, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावल शहरातील बसस्थानक परिसर, जिल्हा परिषदचे शिक्षण तथा आरोग्य समितीचे सभापती रविन्द्र पाटील, जिल्हा परिषद सविता भालेराव, यावल पंचायत समितीच्या आवारात पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी,  उपसभापती योगेश भंगाळे, यावल नगर परिषदचे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक कृषीभुषण नारायण चौधरी, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, सरपंच परिषदचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे, सलीम तडवी, भाजपाचे तालुका सरचिटणीस उदय बाउस्कर, हर्षल पाटील, व्यंकटेश बारी, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राहुल बारी, परेश नाईक, भुषण फेगडे, रितेष बारी, अतुल भालेराव यांच्यासह पक्षाच्या विविध पदाधिकारी यांनी या स्वच्छता मोहीमेत आपला सहभाग नोंदविला तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विलास चौधरी यांनी केले.

 

Protected Content