जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त आसराबारी येथे औषधीचे वाटप

यावल प्रतिनिधी । आज जागतिक फार्मासिस्ट दिनानिमीत्त रेडक्रॉस मेडिसीन बॅंकमार्फत यावल तालुक्यातील आसराबारी पाडा येथे रॅपटाकोस कंपनीमार्फत रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीच्या औषधी, प्रोटीन/विटॅमीन पावडर, रक्तवाढीच्या औषधी, इत्यादी औषधीचे वाटप करण्यात आले.

या सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला  रेडक्रॉसचे मानद सचिव विनोद बियाणी,  वैद्यकिय अधिकारी डॉ. एस.बी.सोनवणे, जनसंपर्क अधिकारी  उज्वला वर्मा, सहाय्यक योगेश सपकाळे, अनवर खान, यावल तालुक्यातील उपकेंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल गजरे उपस्थित होते. यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या आसराबारी पाडा हे ऊसतोड कामगार राहत असलेले ४०० आदिवासी लोकांची  लोकवस्ती आहे. याठिकाणी लहान मुले कुपोषित असल्याचे प्रमाण जास्त आहे. अशा सर्व  बालकांना, गर्भवती महिलांना व इतरांना या औषधींचे वाटप डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले.

या उपक्रमाला  जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, डॉ. प्रमोद पांढरे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन समिती चेअरमन सुभाष सांखला यांचे  मार्गदर्शन लाभले.  तसेच यावलचे रेडक्रॉस स्वयंसेवक सारंग बेहेडे, राहुल पाटील, गोल्डन चव्हाण वड्री गावाचे  सरपंच  अतुल भालेराव, ग्रां.प्र. सदस्य आर.के. चौधरी सर व  सर्व आशा वर्कर्स यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Protected Content