सावदा येथे आदिवासी संघर्ष समितीची जिल्हा बैठक उत्साहात

बोदवड प्रतिनिधी । आदिवासी संघर्ष समिती रावेर तालुक्याच्या वतीने सावदा येथे जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आदिवासी संघर्ष समिती रावेर तालुक्याच्या वतीने सावदा येथे आयोजित जिल्हा बैठकीत प्रभाकर सोनवणे, राज्य कार्यकारणी सदस्य तथा जि.प. गटनेते यांच्या अध्यक्षतेखाली प्रल्हाद सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आ. को. म., जिल्हा अध्यक्ष नितीन कांडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कठोरे, सुकलाल सांगळकर, जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी, जिल्हा अध्यक्ष कर्मचारी संघटना जगदीश सोनवणे, सुनिता कोळी, जिल्हा अध्यक्ष महिला, सोपान सपकाळे जेष्ठ मार्गदर्शक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

सुरूवातीला खेमचंद कोळी, प्रल्हाद भाऊ सोनवणे, जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ कांडेलकर यांनी समाज्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत, जात प्रमाणपत्र जनजागृती करणे बाबत मार्गदर्शन केले.तसेच मा. भांडे साहेब यांच्या वाढदिवसाबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत माहिती दिली.

प्रभाकर सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात समाजावर होणारा अन्यायाबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. खावटी योजना, ठक्कर बाबा योजना असो सर्व बाबतीत समाज हा वंचित आहेत. आपल्या समाजाला मा.भांडे साहेबांसारखे कणखर व अभ्यासु असे नेतृत्व मिळाले आहेत ते नक्कीच आपल्या समाजाला न्याय मिळवून दिल्या शिवाय राहणार नाही. म्हणून आपण सर्व कोळी समाज त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे.. त्या वेळी उपस्थितांनी एकाच आवाजात…. भांडे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं… अशा घोषणा दिल्या.

त्यावेळी बोदवड तालुका अध्यक्ष जगदीश कोळी, रावेर ता. अध्यक्ष मनोहर कोळी, मुक्तानगर अध्यक्ष संजय कांडेलकर, अशोक कोळी, जळगाव ता. अध्यक्ष, कैलास सोनवणे अध्यक्ष धरणगाव, महीला ता. अध्यक्ष सविता कोळी, विनोद कोळी जिल्हा सदस्य चंद्रकांत कोळी, युवक अध्यक्ष, खेमचंद कोळी यावल युवक ता. अध्यक्ष गफ्फुर कोळी, ता. उपाध्यक्ष युवा, किशोर कोळी, यु. ता. सह संघटक राहुल कोळी, ता. युवक उपाध्यक्ष योगेश कोळी, यु. ता. सदस्य पृथ्वी जैतकर, ता. सदस्य सपना कोळी, महीला ता. उपाध्यक्ष रजनी सोनवणे, जिल्हा महीला मुख्य मार्गदर्शक, सचिन महाले ता. उपाध्यक्ष, लक्ष्मण कोळी ता. सदस्य, गोकुळ कोळी ता. सदस्य, बाळु भोलाणे ता. सदस्य, दिलीप कोळी ता. सदस्य, बंटी कोळी,आनंदा कोळी, संदीप कोळी सुरेश सिरसाठ,.महेंद्र कोळी. ऐनगाव, सुरेश कोळी बोदवड, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्र संचालन युवक ता. उपाध्यक्ष रवींद्र सपकाळे यांनी तर आभार विश्वनाथ कोळी यांनी मानले.

 

Protected Content