नगरसेवक अपात्रतेच्या सुनावणीला वेग ! : पुढील घडामोडींकडे लक्ष

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील महापालिकेतील भारतीय जनता पक्षातून फुटलेल्या नगरसेवकांच्या अपात्रतेच्या सुनावणीला आता वेग आला आहे.

जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये उभी फूट पडून सत्तांतर घडले होते. यातून महापालिकेची सत्ता ही भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेकडे हस्तांतरीत झाली होती. यातील फुटीर नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे, तसेच गटनेते म्हणून भगत बालाणी यांनाच मान्यता देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली असून याबाबत न्यायालयान खटला चालला. यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने विभागीय आयुक्तांना दहा आठवड्यांच्या आत यावर निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे भारतीय जनता पक्ष आणि फुटीर गट या दोन्ही गटांची साक्ष नोंदविण्यात आली. भाजपने आधी अपात्रतेचा अर्ज दाखल केला तेव्हा मविआची सत्ता होती. तर आता राज्यात सत्तांतर झाले असून भाजप व शिंदे गटाचे सरकार आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता विभागीय आयुक्तांकडे नेमका काय निकाल लागणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

तर, दुसरीकडे उच्च न्यायालयाने १० आठवड्यांच्या दिलेल्या मुदतीच्या विरोधात फुटीर गट हा उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता देखील आहे. तसे झाल्यास जळगाव महापालिकेचा वाद हा सुप्रीम कोर्टात पोहचणार आहे.

Protected Content