जिल्हाभरात अडीचशे कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी (व्हिडिओ)

जळगाव, संदीप होले । सव्वाशे गावांच्या पाण्याच्या वर्कऑर्डरचे आदेश पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी काढले असून जवळपास अडीचशे कोटी रुपयाच्या पाण्याच्या योजनेस प्राथमिक मान्यता देत विविध गावातील सरपंचांना पाणीपुरवठा योजना मंजुरीचे पत्र देण्यात आले.

जिल्हाभरात पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सव्वाशे गावांच्या पाण्याच्या वर्कऑर्डरचे आदेश पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी काढले असून जवळपास अडीचशे कोटी रुपयाच्या पाण्याच्या योजनेस प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. याप्रसंगी शहरातील अजिंठा विश्राम गृह येथे विविध गावातील सरपंचांना पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी विविध तालुक्यातील आमदार, सरपंच, ग्राम विकास अधिकारी, पाणीपुरवठ्याचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवकालीन बंधारे बांधले गेलेत. या बंधाऱ्यांचा आजही नाव काढले जातात तेच अवचितच साधत छत्रपती शिवाजी महाराजांनी बंधारा बांधला गुलाबराव आणि फक्त त्या बंधाऱ्यातून पाणी द्यायचा आहे. ते पाणी नळाला द्यायचं आहे. डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी फिरणाऱ्या माझ्या बहिणींची वणवण मला थांबवायची आहे. शिवसेनेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये मला पुण्याचे खातं मिळालेलं असून आमदारांनी केलेली मदत, सरपंचाने, ग्राम विकास अधिकारी यांनी पाठविलेले प्रस्ताव आणि अधिकाऱ्यांना तयार केलेले डीपीआर या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा मी आज जिल्ह्यात काम करू शकतो आहे.’ असे त्यानी यावेळी सांगितले.

पालकमंमंत्र्याचा अर्थ होतो की, “पक्ष कोणता यापेक्षा जिल्हा माझा आहे. मला सांगायला अभिमान वाटेल की, जळगाव जिल्ह्यामध्ये पाण्याच्या सगळ्यात जास्त वर्क ऑर्डर भाजपाचा आमदार असलेल्या चाळीसगाव तालुक्याला मिळालेल्या आहेत. काम करतांना पक्षाचा विचार केला नाही गरजेचा विचार केला आहे. जिल्हा माझा आहे आणि त्या जिल्ह्याला पालकमंत्री या नात्याने जो फायदा करता येईल तो करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. असे पालकमंत्री यांनी सांगितले.

व्हिडीओ लिंक :

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/322710236552713

Protected Content