जिल्हा युवा पुरस्काराचे तातडीने वितरण करण्याची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नऊ जिल्हा युवा पुरस्कार जळगाव जिल्हा प्रशासनाने तातडीने वितरीत करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणीचे निवेदन अर्जदारांनी मंगळवार २५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा युवा पुरस्कारांची सर्व प्रक्रिया पार पडले आहे. तरी देखील जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला वारंवार पुरस्कार वितरण करण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली जात आहे. कुठलेही कारण आणि सबब न देता युवा पुरस्कार मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात येत आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्थांची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून उपेक्षा होत असून जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेवून बुधवारी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येवून सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांची तीन वर्षाची प्रतीक्षा संपवावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर सुष्मिता भालेराव, समर्थ बहुउद्देशी संस्थेचे विशाला जाधव, वर्षा उपाध्ये आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content