रासायनिक खतांची दर कमी करा; राष्ट्रवादीचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये झालेली दरवाढ कमी करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी अर्थिक संकटात सापडलेला आहे. आधी कोराना परिस्थीत होती. त्यानंतर अतिवृष्टी व हवामानावतील बदलामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतींमध्ये ६० ते ७० टक्के वाढ केलेली आहे. केंद्र सरकारच्या खत व कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलेल्या कंपन्यांद्वारे रासायनिक खते उपलब्ध होत असतात. गेल्या काही महिन्यांपासून रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये प्रचंड दरवाढ होत असून ही दरवाढ शेतकऱ्यांना जीवघेणी ठरत आहे. तरी लवकरात लवकर रासायनिक खतांची दरवाढ तातडीने कमी करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक अध्यक्ष रविंदनाना पज्ञटील, भुसावळ तालुकाध्यक्ष दिपक मराठे, अल्पसंख्याक महानगराध्यक्ष डॉ. रिझवान खाटीक, गोपाल बाबुराव गंगनिरे, किरण वंजारी, कैलास चौधरी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content