भरधाव बसच्या धडकेत विद्यार्थीनी जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्लास संपवून घरी निघालेल्या तरूणीच्या दुचाकीला एस.टी.बसने समोरून धडक दिली. या अपघातात तरूणी जखमी झाली असून ही घटना मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता शिवाजीनगर उड्डाणपूलाजवळ घडली. याप्रकरणी शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी नगरातील राशी जगदीश पटेल ही तरूणी मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता दुचाकीने (क्र. एमएच.१९.एए.५९५८) क्रिकेटच्या क्लासला गेली होती. क्लास संपवून ती सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने घराकडे जाण्यासाठी निघाली. दरम्यान, शिवाजीनगर उड्डाणपूलाजवळ इदगावकडून आलेल्या एसटी बसने तिच्या दुचाकीला समोरून धडक दिली. हा अपघात होताच राशी ही जखमी होऊन बेशुध्द झाली. त्यानंतर तिला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तिच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात एस.टी.बस चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content