बसस्थानकातून तीन प्रवाशांच्या खिशातून रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकासह इतर दोन जणांच्या खिशातून एकुण १४ हजार ३०० रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. याबाबत गुरुवार २० ऑक्टोबर रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायरू तुळशीराम इंगळे (वय-६८) रा.  गोरक्ष नगर रोड, आकोला हे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आहे. ते कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आलेले होते. गुरुवार २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार  वाजेच्या सुमारास ते नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत संशयित आरोपी दीपक ओमप्रकाश वर्मा (वय-४२) रा. धनगर पुरा, जालना या चोरट्याने रोकड लांबविले. दरम्यान याच वेळी सोबत असलेले प्रवासी उत्तमराव राजधर भागवत रा. चाळीसगाव आणि प्रकाश आनंदा पाटील रा. केऱ्हाडे ता.रावेर यांच्या ताब्यातील देखील काही रोकड रक्कम व कागदपत्रे चोरून येण्याचे समोर आले. अधिक चौकशी केली असता तिघांचे मिळून १४ हजार ३०० रूपयांची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत प्रवाशांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता संशयित आरोपी दीपक ओम प्रकाश वर्मा (वय-४२) रा. धनगरपुरा जालना आणि सोबत असलेल्या अज्ञात व्यक्ती या दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहे.

 

Protected Content