Home क्राईम शेतातील पत्र्याच्या शेडमधून ईलेक्ट्रीक केबल वायरची चोरी

शेतातील पत्र्याच्या शेडमधून ईलेक्ट्रीक केबल वायरची चोरी


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील शिवारात शेतातून ५५ हजार ५०० रूपये किंमतीचे केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर येथील रहिवाशी योगेश विठ्ठल भंडागे (वय-४१) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याचे जळगाव रोडवरील पहूर शशिवारात शेत आहे. शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये शेतीसाठी लागणारा सामान ठेवला जातो. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते २७ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील शेडमध्ये ठेवलेली ५५ हजार ५०० रूपये किंमतीची ईलेक्ट्रीक केबल वायर चोरून नेल्याचे उघडकीला आला. याबाबत योगेश भंडागे यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भरत लिंगायत करीत आहे.


Protected Content

Play sound