बनावट दस्तावेज तयार करून महिलेची ५० लाखांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंजाब राज्यातील राजपुरा येथील शर्वरी दीपक डाहरा या जळगावात हेल्थ कन्सल्टंटचे काम करतात. त्यांचे मोठे दीर अशोक रामचंद्र डाहरा, सुशिल रामचंद्र डाहरा व त्यांचे व्यावसायिक मित्र राहुल सुदेश गुप्ता व त्यांचे वडील सुदेशकुमार लालचंद गुप्ता (दोघ रा. चंदीगढ) यांनी महिलेकडून ६० लाख रुपये घेतले. तसेच त्यांची स्टॅम्प पेपरवर सही घेवून त्यांच्या पश्चात त्यांच्या घरातून महत्वाची कागदपत्र व कोरे धनादेश घेवून जात बनावट दस्तावेज तयार करीत त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रिंगरोड परिसरातील माहेर असलेल्या शर्वरी दीपक डाहरा या वास्तव्यास आहे. त्यांचा विवाह दि. २५ जून २००७ मध्ये पंजाब राज्यातील राजपूरा येथील दीपक डाहरा यांच्यासोबत झाला होता. त्यानंतर दि. २३ डिसेंबर रोजी दीपक डाहरा यांचे अपघाती निधन झाल्यामुळे शर्वरी डाहरा या मुलीसोबत चंदीगढ येथे राहत होत्या. डाहरा यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांनी पतीच्या सहाव्या हिस्साची मागणी केली. त्यावर चर्चा झाल्यानंतर त्यांचे मोठे दीर यांनी सांगितले की, शर्वरी यांना त्यांच्या मुलीसाठी दोन कोटी रुपयांचे घर खरेदी करुन व कौटुंबिक मालमत्तेच्या आणि व्यावसायाचा वाटा हिस्सा दिला जाईल असे सांगितले. त्यानंतर व्यावसायीक मित्र असलेला राहूल गुप्ता याने चंदीगढ येथील घर दाखविले होते. अशोक डाहरा यांनी गुप्ता याला ४० लाख रुपये देवून शर्वरी डाहरा यांच्या नावावर ते घर करुन देण्याचे सांगितले होते. त्यामुळे डाहरा या त्या घरात राहून तेथेच हेल्थ कन्सल्टन्सीच व्यवसाय करीत होत्या.

राहूल गुप्ता याने शर्वरी डाहरा यांच्या ऑफिसमध्ये जावून त्याने बँकेचे दोन धनादेश, सही केलेले कागद व मौल्यवान कागदपत्र व पासपोर्ट साईज फोटो लबाडीच्या इराद्याने घेवून गेला. तसेच बनावट दस्ताऐवज तयार करुन डाहरा यांचा विश्वासघात करीत फसवणूक केली. तसेच त्यांच्या मुलीला जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. याप्रकरणी डाहरा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त. त्यांचे मोठे दीर अशोक रामचंद्र डाहरा, सुशिल रामचंद्र डाहरा व त्यांचे व्यावसायिक मित्र राहुल सुदेश गुप्ता व त्यांचे वडील सुदेशकुमार लालचंद गुप्ता (दोघ रा. चंदीगढ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content