शिवकॉलनीत गुलाबराव पाटीलांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनीजवळील राष्ट्रीय महामार्गाजवळ गुवाहाटीला गेलेले आमदार गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी पाठींबा देत जोरदार घोषणाबाजी केली. तर खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.

शिवसैनिक सुनील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले की, आमदार गुलाबराव पाटील यांनी गेल्या ३ वर्षांपासून शिवसेनेसाठी भरपूर काम केले तसेच ३० ते ३५ केसेस अंगावर घेतल्या आणि संपूर्ण जिल्हा नव्हेच तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना मजबुतीसाठी अहोरात्र काम केले. तसेच शिवसेनेचे संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याबद्दल सर्व शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे व त्यांनी त्यांचा निषेध याठिकाणी व्यक्त केलेला आहे.

याप्रसंगी त्रिमूर्ती कॉलेजचे संस्थापक मनोज पाटील, हॉटेल राधिकाचे संचालक भूषण पाटील, सचिन गोळबे, भरत पवार,  संजय महाजन, गणेश राठोड, अमित तिवारी, राहुल पाटील, डॉ गजानन पाटील, अॅड सुनील पाटील, राहुल नवल पाटील, संदीप भालेराव, शेखर साळुंखे,  प्रल्हाद महाजन आदी उपस्थित होते

 

Protected Content