Home क्राईम नाशिराबाद येथील खळवाडीतून बॅटरीसह धान्याचे दोन पोते लंपास

नाशिराबाद येथील खळवाडीतून बॅटरीसह धान्याचे दोन पोते लंपास

0
102


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील खळवाडीतून ट्रॅक्टरच बॅटरी आणि धान्याचे दोन पोते असा एकुण ४ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जितेंद्र यशवंत महाजन वय-४३  रा. नशिराबाद ता. जि.जळगाव हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे शहरातील न्यू इंग्लिश स्कूल जवळ असलेल्या खळवाडी आहे. याठिकाणी शेती करण्यासाठी लागणारे वस्तू ठेवतात. खळवाडीत ठेवलेले मका आणि सोयाबिन धान्याचे दोन पोते आणि ट्रॅक्टरची बॅटरी असा एकुण ४ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाला अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार शनिवार ११ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी जितेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून शनिवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन देशमुख करीत आहे.


Protected Content

Play sound