पंतप्रधानाच्या विरोधात कॉमेडियन श्याम रंगीला लोकसभेच्या रिंगणात

वाराणसी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात प्रसिध्द कॉमेडियन श्याम रंगीला उतरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात श्याम रंगीला लोकसभा निवडणूक लढवत आहे. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री ओळखला जाऊ लागला आहे. २०१७ मध्ये त्यांनी स्टार प्लस शो ‘लाफ्टर चॅलेंज’ च्या मंचावर पंतप्रधान मोदींची नक्कल केली होती.
श्याम रंगीला यांने १४ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. श्याम रंगीलाचे यूट्यूबवर जवळपास साडेनऊ लाख फॉलोअर्स आहेत. श्याम रंगीला हा आम आदमी पक्षाचा सदस्य आहे. परंतू त्यांने अपक्ष उमेदवार म्हणून वाराणसीमधून अर्ज दाखल केला आहे. त्याशिवाय वाराणसीमधून एकून ४१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे यंदाची वाराणसीची लढत ही चांगलीच रंगणार आहे. वाराणसीमध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजे 1 जून रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

Protected Content