Home क्राईम केक तलवारीने कापणे पडले महागात

केक तलवारीने कापणे पडले महागात

0
37

 

 यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील कोळन्हावी येथील निलेश सोळुंके याने वाढदिवसानिमित्ताने तलवारीने केक कापल्यावर  त्याच्यासह  सहकार्याविरुद्ध आर्मएक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

 

संशयित आरोपींना ताब्यात घेत तलवारही पोलिसांनी जप्त केली आहे .  कोळन्हावी येथील निलेश रमेश सोळुंके याचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने वाढदिवसासाठी आणलेला केक मित्रांसमवेत तलवारीने कापला केक कापण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांचे निदर्शनास आला पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार हेकॉ सुनील तायडे, संजय तायडे यांना या  तरुणाचा त्यांनी शोध घेण्यास लावला

 

हे तरुण तालुक्यातील  कोळन्हावी येथील असल्याचे समजल्यावर  बुधवारी निलेश सोळुंकेसह त्याचा मित्र समाधान  तायडे या दोघांना पोलिसांनी अटक केली सहाय्यक  फौजदार अजित शेख यांचे फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध आर्म एक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास पो उनि  जितेंद्र खैरनार , अमलदार सुनील तायडे व संजय तायडे करीत आहेत .

 


Protected Content

Play sound