संघर्ष दिव्यांग संस्थेतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वृक्षारोपण

जळगाव, प्रतिनिधी । येथील संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशिय संस्थेतर्फे जिल्ह्यात २७५  वृक्षरोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याचा प्रारंभ म्हणून आणि कार्यकर्ते गोपाळ कासार यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

वृक्षांमुळे मानवी जीवन टिकून आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण महत्वाचे असल्याचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले.  ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, लोकमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर वैद्य, संघर्ष दिव्यांग संस्थाचे अध्यक्ष गणेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील धोबी कक्षाच्या आवारात आवळा व बेलाची रोपे अधिष्ठाता डॉ. रामानंद व उप अधिष्ठाता डॉ. पोटे यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी डॉ. किशोर इंगोले, डॉ. सतीश सुरळकर, विश्वजीत चौधरी, हेमंत जोशी, अजय जाधव, प्रकाश पाटील, विशाल देशमुख, गौरव डांगे, दिपाली कासार, गोपाल कासार, आनंद शिरापुरे, संजय जाधव, जितू पाटील, किशोर नेवे, प्रवीण भोई, राजेंद्र वाणी, गजानन हटकर, संतराम एकाशिंगे, आशा पाटील, संगीता प्रजापती, मनीषा दळवी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content