सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करा — उमेश महाजन

एरंडोल, प्रतिनिधी । सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस ३ जानेवारी हा घराघरात महिला शिक्षण दिवस साजरा करावा, असे आवाहन महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच, ऑल इंडियाचे युवक प्रदेश अध्यक्ष उमेश अभिमन महाजन यांनी केले आहे. यावेळी उमेश महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या यशोगाथेला उजाळा दिला.

३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव, सातारा येथे सावित्री बाई फुले यांचा जन्म झाला व १८४० रोजी सावित्री बाईंचा महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर सावित्री बाईं व ज्योतीराव फुलेंनी आशिया खंडातील मुलींसाठी पहिली शाळा काढली. सती प्रथा बंद केली, बालहत्या प्रतिबंध केला, बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. अत्याचार झालेल्या महिला, विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. विधवांचे केशवपनाची पध्दत बंद केली, विधवा महिलांचे पुनर्विवाह घडवून आणले. अशा या थोर विभूतीचा जन्म दिवस अर्थात ३ जानेवारी हा घराघरात महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्या यावा अशी अपेक्षा उमेश महाजन यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content