सुनील पाटील यांचा सत्कार

 

 

पारोळा प्रतिनिधी । येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद भावसार यांना नेहमीच गुणी व्यक्तिबद्दल आदर वाटत असतो. ४५ कुपोषित बालकांना पोषण आहार देणारे सुनील पाटील यांचा त्यांनी सत्कार केला

येथील पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी ( ग्रा. पं. ) सुनील अमृत पाटील हे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून गेल्या पाच वर्षांपासून वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त समाजोपयोगी विविध उपक्रम राबवत असतात. याही वर्षी तालुक्यातील तब्बल ४५ कुपोषित बालकांना प्रत्येकी दोन किलो शेंगदाणे व एक किलो गुळाचं मोफत वाटप करुन पुन्हा एकदा दातृत्वाचा आदर्श निर्माण केला.याबद्दल भावसार सरांनी शाल,श्रीफळ, पुष्पहार व अभिनंदन पत्र देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुनील पाटील व भावसार सरांचे शहरात अभिनंदन होत आहे .

Protected Content