अमेझॉन , रिलायन्सच्या वादात मोदींचे सँडविच !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतातील १ ट्रिलियन ग्राहक बाजारावर वर्चस्व मिळवण्यासाठी अमेझॉन आणि रिलायन्स उद्योग समूह यांच्यात कोर्टात आणि कोर्टाच्या बाहेरही लढाई सुरू आहे. धोरण आणि स्वदेशी प्रोत्साहन अशा कात्रीत अडकलेले पंतप्रधान मोदी यांच्यासाठीही हा कसोटीचा मुद्दा आहे

फ्युचर समुहासोबतच्या व्यवहारावरुन हा वाद सुरू आहे. अमेझॉनकडून रिलायन्स आणि फ्युचर समूह यांच्यातील व्यवहार रद्द करण्याचे प्रयत्न आहेत. फ्युचर समुहाने मुकेश अंबानींसोबत व्यवहार करताना करार नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा अमेझॉनचा दावा आहे. अमेझॉनच्या आरोपांना कायदेशीर आधार आहे का याची पडताळणी आता दिल्ली हायकोर्ट करत आहे.

जेफ बेजोस आणि मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यामुळे या दोघांची लढाई ही फक्त दोन कंपन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ही लढाई आता परकीय विरुद्ध देशी अशी झाली आहे. अमेरिकेतील बिग ब्रदर अमेझॉन बाहेरच्या छोट्या उद्योगांना चिरडण्यासाठी निघालेला आहे, असा युक्तीवाद फ्युचर समुहाच्या वकिलाने केला. तर रिटेलर लॉबीनेही फ्युचर समुहाला पाठिंबा दर्शवलाय.

उद्योगांमधील कंत्राटांची भारतीय न्यायव्यवस्थेत कडेकोट अंमलबजावणी व्हावी, अशी अमेझॉनची इच्छा आहे. फ्युचर समुहाला अमेझॉनसोबतचा करार रद्द करण्याची मुभा मिळाली तर जगभरातील उद्योजकांना चुकीचा संदेश जाईल आणि भारतातील गुंतवणूक सुरक्षित नसल्याचं वातावरण होईल, असं अमेझॉनचं म्हणणं आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कठीण क्षण आहे. कारण, भारतीय अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधान मोदी जागतिक गुंतवणूकदारांना भारतात निमंत्रित करत आहेत.

या करारात अमेझॉन आणि रिलायन्स दोन्ही कंपन्यांचं बरंच काही पणाला लागलं आहे. कारण, हा व्यवहार यशस्वी झाला तर रिलायन्सला देशातील सर्वात मोठ्या ग्राहक बाजारात प्रवेश मिळेल. तर अमेझॉनसाठी हा मोठा फटका असेल. दुसरीकडे मुकेश अंबानी ग्राहक डेटासारखा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीयत्वाचं कार्डही खेळत आहेत.

या आठवड्यात रिलायन्स रिटेलनेही स्वदेशीचा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रिलायन्सने हा निर्णय घेतला.

गेल्या वर्षी किशोर बियानी यांच्या फ्युचर समुहाने जागतिक ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनसोबत एक करार केला होता. अमेझॉनने फ्युचर कुपन्समध्ये ४९ टक्के शेअर्स विकत घेतले होते. ही फ्युचर रिटेलची प्रवर्तक कंपनी आहे. यामुळे फ्युचर रिटेलच्या वस्तू अमेझॉनवर उपलब्ध होतील आणि या वस्तू अमेझॉनच्या पुढील नियोजनाचाही भाग असतील, अशी तरतूद होती. पण बियानी यांनी रिलायन्ससोबत व्यवहार केला आणि अमेझॉनने यावर आक्षेप घेतला. हे कराराचं उल्लंघन असल्याचं अमेझॉनचं म्हणणं आहे.

Protected Content